शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी

By admin | Updated: September 6, 2015 22:38 IST

जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी

चांदवड : येथील होळकरकालीन श्री गोवर्धन गिरिधारी गोपालकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांनी श्री गोपालकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रमाकांत जोशी (सटाणा), व भक्ती समुद्र (बदलापूर), नितीन महाराज मुडावदकर ( कळवण) यांचे कीर्तन, तर लौकिक महाराज जोशी ( अजमेर सौंदाणे) यांचे कीर्तन झाले. गीतापाठ, विष्णू सहस्त्रनामाचे वाचनही करण्यात आले. श्रींचा अभिषेक, रात्री ९ वाजता भूषण महाराज लोहोणेरकर यांचे कीर्तन व रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. रविवारी (दि.६) दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती व महाप्रसाद व रात्री भूषण महाराज लोहोणेरकर यांचे काल्याच्या कीर्तनाने जन्माष्टमीचा समारोप झाला. यावेळी श्रींना ५६ भोग ( विशेष नैवैद्य) समर्पण केले. अशी माहिती अरुण दीक्षित, किशोर दीक्षित, अमोल दीक्षित, भूषण दीक्षित परिवाराने दिली. उत्सव काळात श्रींची मूर्ती अर्धनारी राधा, बालाजी, देवर्षिनारद, श्रीनाथजी अशा विविध रुपात साजश्रृंगार करून सजविली जात होती. भाविकांना श्रींच्या विविध रुपांचे दर्शन होत होते. मालेगाव : येथील संगमेश्वरातील अजिंठा प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीदेखील साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सखाराम घोडके होेते. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येसगाव विवेकानंद स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. आर. माळी व संस्थेचे सचिव यशवंत लिंगायत उपस्थित होते. तसेच कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी श्रीकृष्ण, राधा, गवळण आदिंच्या वेशभूषा केल्या होेत्या. या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्ये सादर केली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शारदा बैरागी यांनी केले. मुख्याध्यापक दीपक अहिरे यांनी आभार मानले. ईलाईट प्री-प्रायमरी स्कूलयेथील ईलाईट प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गोकुळाष्टमी (दहीहंडी) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आराध्य पाटील, आर्यन भावसार, संयोगीता गुंजाळ, श्लोक जाधव, अवनी केल्हे, सरस्वतीचंद्र भामरे आदि विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा परिधान करून दांडिया नृत्य सादर केले. तसेच दहीहंडीदेखील फोडली. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)