शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उचलणाऱ्यांची अशीही ‘दबंगगिरी’

By admin | Updated: July 26, 2016 00:19 IST

दुचाकी सोडून चक्क बसप्रवाशालाच बुकलले

नाशिक : शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्याचा ठेका दिलेल्या खासगी मक्तेदारांच्या कर्मचाऱ्यांची दिवसेंदिवस मुजोरगिरी वाढतच चालली आहे.सोमवारी (दि.२५) तर त्याचा कळसच झाला. दुचाकी उचलण्याचे सोडून वाहतूक शाखेच्या टेम्पोत कार्यरत एका कर्मचाऱ्याने चक्क बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशालाच मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास महापालिकेच्या राजीव गांधी भवन समोरील सुयोजित ट्रेड सेंटर आणि संकुलाच्या बाहेरील दुचाकी उचलण्यासाठी वाहतूक शाखेच्या टेम्पोमधील कर्मचाऱ्याने राजीव गांधी भवन जवळील सिग्नलजवळ उभ्या असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या बसमध्ये बसलेल्या एका युवकाला बसमधून खाली खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. क्षणभर कोणाच्याच हा प्रकार लक्षात आला नाही. आकाशी रंगाचे टी शर्ट घातलेल्या या वाहतूक शाखेने दुचाकी उचलण्याचे कंत्राट दिलेल्या मक्तेदाराकडे कार्यरत या कर्मचाऱ्याने नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्याचे सोडून बसमधील प्रवाशाला का ‘लक्ष्य’ केले, हे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यानंतर सिग्नलवर दबंगगिरी स्टाईलने मारहाण करणाऱ्या या कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी व नागरिकांनी अडविल्यावर संबंधित युवकाची सुटका झाली. शहर वाहतूक शाखेतर्फे दुचाकी व चारचाकी उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटदाराबाबत जुने नाशिक परिसरात आधीच ‘भाईगिरीची’ वदंता असल्याने मक्तेदाराने ठेवलेले कर्मचारीही दुचाकी उचलताना सर्वसामान्य नाशिककरांवर दमदाटी करीत असल्याच्या अनेक तक्रारींची चर्चा आहे. आता चक्क बसमधील प्रवाशांना मारहाण करण्याइतपत या दुचाकी उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची दबंगगिरी वाढल्याने त्यास पोलिसांनी आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)