शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते चक्रीवादळाने ८१२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

नाशिक: अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला ...

नाशिक: अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आदिवासी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा अधिक फटका बसला आहे.

गुजरातच्या सीमारेषेजवळील तसेच घाटमाथ्यावरील तालुक्यांमधील गावांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार या तालुक्यांमध्ये ऑरेंज अलर्टदेखील जाहीर करण्यात आला होता. रविवार, दि. १६ ते १८ मे या तीन दिवसांच्या कालावधीत सुरगाणा, पेठ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला. सुरगाण्यात २,५४१ तर पेठमध्ये १,४१८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सुमारे ८१२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू या पिकांचा समावेश आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाहणारे वारे तसेच पावसाचे सावट जिल्ह्यावर असले तरी सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील पिकांना फटका बसला. या तालुक्यांमध्ये ७९८ हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाले, तर काही प्रमाणात डाळिंब आणि पेरूची बागही उद्‌ध्वस्त झाली. ११ हेक्टरवरील भाजीपाला नुकसानीचीा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी वादळामुळे पंचनामे करण्यास काही प्रमाणात अडचणही निर्माण झाली होती. सातत्याने होणारा पाऊस तसेच वादळामुळे येणाऱ्या अडचणीनंतरही नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नुकसानीत रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळाने सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुूपारनंतर झालेल्या पावसानेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.