शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळात जिल्ह्याला ३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा ...

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा आणि जोरदार पावसाच्या तडाख्याने सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान आले असून जवळपास ८५० घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना बसला.

वादळाचा वेग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, तर तालुकापातळीवर आपत्ती निवारणाची तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याला वादळाचा फारसा फटका बसणार नाही, असा अंदाज वर्तविला जात असला तरी सुरगाणा, कळवण तसेच पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा चांगलाच फटका बसला. अन्य तालुक्यांनाही थोड्याफार प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कालावधीत कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपिकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.

गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले हाेते. आता तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १९.१४ हेक्टरवरील बागायत पिकांखालील क्षेत्र प्रभावित झाले, तर

१६३३.४७ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीचा एकूण अंदाज २ कोटी ९६ लाख ६१ हजार इतका आहे. जिल्हा प्रशासनाने हा नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच काही ठिकाणी घराचे छप्पर उडाल्याने घरांचे अंशत: नुकसान झाले. मका, बाजरी, कांदासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. आंब‍ा, पेरू, डाळिंब या फळबागांनाही फटका बसला आहे. एकूण १ हजार ६५२ हेक्टरवरील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

--इन्फो--

जिल्ह्यात कोरोनाचे संकट असतानाही चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच कृषी खात्याने पंचनाम्यांचे काम हाती घेतले. तालुका पातळीवरील कृषी अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ ते १९ मे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. नऊ तालुक्यांना वादळाचा फटका बसला असून या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्यात आले आहेत.