शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सलामताबादमध्ये एकावर कटरने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST

एनएक्स हॉटेलजवळून दुचाकी चोरी मालेगाव : शहरातील एनएक्स हॉटेलजवळून ४० हजार रुपये किमतीची हीरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच ...

एनएक्स हॉटेलजवळून दुचाकी चोरी

मालेगाव : शहरातील एनएक्स हॉटेलजवळून ४० हजार रुपये किमतीची हीरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच ४१ एटी ९५८९) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मोहंमद इस्माईल शब्बीर अहमद (४७) यांनी किल्ला पोलिसात खबर दिली. अधिक तपास उपनिरीक्षक गोपाळ करीत आहेत.

---------------

महामार्गावर अपघात; एक ठार

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर हॉटेल प्रभूजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने नानाजी राघो पिंपळसे (३०, रा. मुंगसे) हा ठार झाला. गेल्या सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कार (क्र. एमएच ०६ जे ८३८९) चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय देवचंद माळी (४६, रा. मुंगसे) यांनी फिर्याद दिली. आरोपीने भरधाव वेगात मालेगावकडून नाशिककडे कार चालवून नेताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या नानाजी पिंपळसे यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्यास व मांडीस गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मरणास कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.

----------------

बनावट जातीचा दाखला बनविल्याप्रकरणी गुन्हा

मालेगाव : खोटे प्रतिज्ञा पत्र देऊन जातीचा बनावट दाखला बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अलका पवन ठाकूर व इतर ४ जण रा. हिंमतनगर, कॅम्प यांचेविरुद्ध छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ११ मार्च ते २९ ऑगस्ट २०२० दरम्यान ही घटना घडली. नायब तहसीलदार दिलीप बाबूराव वाणी यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी ठकबाजीचा गुन्हा दाखल केला. आरोपी दोघांनी अलका ठाकूर हीस जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी सेतू कार्यालयात आणले. तिला हिंदू भिल्ल जातीचा दाखला मिळण्यासाठी आरोपींच्या मदतीने सेतू कार्यालयात कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नावाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज केला. सदर अर्जासोबत अलका ठाकूर हिने मनपा मराठी शाळा क्र. ३१कडे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर अलका पवन ठाकूर असे नाव असताना खाडाखोड करून अलका पवन ठाकरे या नावाचा शाळा सोडल्याचा दाखला व ५० वर्षांपूर्वीचा पुरावा म्हणून अलका ठाकूर हिचे वडील पवन फुला ठाकरे या नावाचा झुंबरलाल पन्नालाल काकाणी विद्यालय मालेगाव येथील १० जुलै १९४४ या वर्षाचा शाळा सोडल्याचा खोटा बनावट दाखला तयार केला. जातीच्या दाखल्याकामी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन आरोपी अलका ठाकूर हिने अलका पवन ठाकरे या नावाने भिल्ल जातीचा दाखला बेकायदेशीररीत्या व गैरहेतूने स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी मिळविला व फसवणूक करून घेतली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक आखाडे करीत आहेत.

----------------------

रोंझाणे जंगलात तरुणाचे प्रेत

मालेगाव : तालुक्यातील रोंझाणे शिवारात गोरख बापू शेवाळे (३०) रा. रोंझाणे याचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले. पोलीसपाटील शांताराम बारकी मंडलिक यांनी तालुका पोलिसात खबर दिली. गोरख शेवाळे हा इसम २३ नोव्हेंबर रोजी रात्री घरातून बेपत्ता झाला होता. २ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास रोंझाणे शिवारातील जंगलात मेंढपाळास मृतदेह आढळून आला. मयताच्या अंगावरील कपडे व त्याच्या भ्रमणध्वनी संचावरून त्याची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.

------------------

गळफास घेऊन मनोरुग्णाची आत्महत्या

मालेगाव : शहरातील द्याने शिवारात धीरज धर्मराज गौतम (१९) रा. द्याने याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताच्या लहान भावाने रमजानपुरा पोलिसात खबर दिली. मयत धीरज गाैतम हा मनोरुग्ण होता. बुधवारी (दि. २) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

------------------