शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कट प्रॅक्टिसच्या विधेयकाचा पत्ताच कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:58 AM

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कट प्रॅक्टिस विरोधी कायदा करण्यासाठी तयारी केली खरी; परंतु ...

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कट प्रॅक्टिस विरोधीकायदा करण्यासाठी तयारी केली खरी; परंतु वर्ष उलटत आले इतकेच नव्हे  तर सरकारची कारकीर्द संपत आली,  परंतु तरीही हे विधेयक चर्चेलाच आले नाही. नाशिकसह उत्तर महाराष्टत दोनच दिवसांपूर्वी सुमारे वीस ते बावीस डॉक्टरांच्या आस्थापना तसेच पॅथॅलॉजी लॅबवर आयकर विभागाने छापे घातले. आयएमएच्या नाशिक शाखेने इन्कार केला असला तरी कट प्रॅक्टिस हा त्यातील प्रमुख मुद्दा असल्याची चर्चा होती.  त्यामुळे कट प्रॅक्टिस हा मुद्दा चर्चेत आला आहे.  वैद्यकीय सेवाही नागरिकांची गरजच नव्हे तर हक्क बनला आहे. ही सेवा  देताना नागरिकांना ती रास्त दराने मिळाली पाहिजे तसेच सर्व प्रकारच्यासेवेत पारदर्शकता असली पाहिजे, परंतु नोबेल प्रोफेशन मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांत काही अपप्रवृत्ती शिरकाव झाला आहे. त्यामुळे कट प्रॅक्टिसही अनुचित प्रथाही सुरू केली आहे.  उपचारासाठी येणाºया रुग्णाला विशिष्ट लॅबमधून चाचण्या करण्यास  भाग पाडणे किंवा विशिष्ट डॉक्टरकडून निदान करण्यास सांगणे आणि  त्या बदल्यात संबंधित डॉक्टरांकडून  किंवा लॅबचालकाकडून कमिशन घेणे यापुरताच हा विषय मर्यादित नसून  विशिष्ट कंपनीचीच औषधे लिहून देण्यापासून अन्य अनेक विषय यात मोडतात.  विशेष म्हणजेच या गैरप्रकारांविरुद्ध १९९५ पासून तज्ज्ञ डॉक्टरांनीच  आवाज उठवला होता. यात डॉ.  मणी, महाड येथील डॉ. बावस्कर, मुंबईतील डॉ. पंड्या अशा अनेकांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत  केली होती.काय आहे तरतुदी?कट प्रॅक्टिसबाबत कोणीही प्रतिज्ञापत्रावर तक्रार करू शकेल. त्यानंतर पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे मेडिकल कौन्सिल सुचवेल असा एक वैद्यकीय व्यावसायिक तक्रारीची तीन महिन्यांत शाहनिशा करतील. तोपर्यंत संबंधित ज्या डॉक्टरच्या विरोधात तक्रार आहे, त्याचे नाव सार्वजनिक केले जाणार नाही.तपासात संबंधित डॉक्टर दोषी असल्याचे आढळले तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. संबंधित डॉक्टरवर न्यायालयात दोषारोप सिद्ध झाले तर पन्नास हजार रुपये दंड आणि एक वर्षे कारावास त्याचप्रमाणे दुसºयांदा पुन्हा असाच गुन्हा केला तर एक लाख रुपये दंड व करावासाची शिक्षा असे प्रस्तावाचे स्वरूप आहे.याशिवाय गुन्ह्याची माहिती मेडिकल कॉन्सिललादेखील दिली जाईल. त्यामुळे कौन्सिल त्यांच्या स्तरावर योग्य ती कारवाई करू शकेल.कायद्याने काही घडेल असे वाटत नाही. कारण जी प्रवृत्ती असते त्याला बदलता येईल, असे वाटत नाही. मात्र, आयुष्यमान भारत व अन्य विमा योजना चांगल्या आहेत. अशा सरकारी योजना सक्षमतेने आणि तुलनेत स्पर्धात्मक दराने चालवल्या तर खासगीकडे जाण्याचा ओढा कमी होईल. त्यामुळे पुढील प्रश्न निर्माण होणार नाही असे वाटते.  - डॉ. श्याम अष्टेकर,  आरोग्यसेवा क्षेत्रातील अभ्यासकसमितीने यासंदर्भातील कायद्याचे प्रारूप तयार करून राज्यशासनाला सादर केले. शासनाने विधी विभागाकडे ते पाठविले होते; परंतु त्यानंतर विधी मंडळाकडे ते जाऊन विधेयक मांडले जाणे आणि कायद्यात रूपांतर होणे हे सरकारची मुदत संपत असतानाही शक्य झालेले नाही. त्यामुळे तूर्तास कायदा होणे शक्य नसल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल