शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक खूश : पेट्रोल, डिझेलचे उतरले दर

By admin | Updated: June 18, 2017 00:56 IST

पेट्रोल पंपचालकांना ८० लाखांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शुक्रवारपासून तेल कंपन्यांकडून इंधनाचे दररोजचे दर जाहीर करणे सुरू झाल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना होत असला तरी, जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांना गेल्या दोन दिवसांत जवळपास ८० लाखांचा फटका बसला आहे. यापुढे इंधनाचे जे काही दर तेल कंपन्या जाहीर करतील त्याच दरात ग्राहकांना इंधन खरेदी करावे लागणार आहे, मात्र दर वाढल्यास त्याचा लाभ पंपचालकांना होणार आहे. तेल कंपन्यांनी देशभरासाठी हा निर्णय घेतल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री शुक्रवारसाठीचे पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर करण्यात आले, त्यात दोन्ही इंधनाचे दर एक रुपये वीस पैसे या दराने कमी झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर शनिवारीदेखील काही पैसे कमी झाल्याने साधारणत: दोन दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन रुपयांनी घट झाल्याचे पेट्रोलपंपचालकांचे म्हणणे आहे. तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कमी झालेल्या इंधन दरामुळे वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, तेल कंपन्यांच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष फटका मात्र पेट्रोल पंपचालकांना बसू लागला आहे. इंधनाच्या दररोजच्या बदलत्या दराला पेट्रोल पंपचालकांनी विरोध दर्शवून त्याविरोधात देशपातळीवर आंदोलनही उभे केले असून, सध्या काळ्या फिती लावून पंपचालकांवर संकटतेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे पंपचालकांना दोन दिवसांत मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेल कंपन्यांच्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा. देशपातळीवर तेलाचे दर कोसळत आहेत हे दोन दिवसातच स्पष्ट झाले आहे. तेलाचे दर वाढल्यावर पंपचालकांना फायदा होईल, असे सांगितले जाते. पण, त्यात अनिश्चितता आहे. - मनोज चोरडिया, पेट्रोलपंपमालक