शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 16:36 IST

देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीयकृत बँकेतील सदर सुविधा पुन्हा पुरविण्याची मागणी

देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू करण्यात आली. यामुळे शहरात देना बँकेच्या शाखेवरील कामाचा भार कमी होऊन ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु या तिन्ही शाखांपैकी देना बँकेत ग्राहक असलेल्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे हया ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकऱ्यांचे विविध शासकीय अनुदान, शेतीमाल विक्र ीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत असतात. लॉक डाऊन होण्यापूर्वी बँकेत पासबुक भरून देण्याची सुविधा दिली जात असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहारांची माहीती होण्यास मदत होत असे. परंतु लॉक डाऊन संपल्यानंतर बँक कर्मचारी ग्राहकांना पासबुक भरून देत नसल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यावर होणाºया आर्थिक व्यवहारांची माहीती मिळत नाही. अशिक्षीत ग्राहकांना तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.बँकांचे आर्थिक व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. शहरातील राष्ट्रीयकृत बँकात शेतकरी खातेदारांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकºयांना आॅनलाईन सुविधेचा उपयोग करता येत नाही. त्यांना खाते पुस्तकावरून त्यांचे खात्यावरील आर्थिक व्यवहार समजणे सोईचे जाते. यामुळे बँकेने महिन्यातून एकदा ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा द्यावी व ग्राहकांची गैरसोय दूर करावी.- संतोष शिंदे, शेतकरी, देवळा.शहरातील इतर बँकात ग्राहकांना खाते पुस्तक भरून दिले जाते. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते पुस्तक भरून दिले जात नाही. देना बँकेच्या बेशिस्त कारभाराचा मला अनुभव आला आहे. बँकेकडे मी चेकबुकची मागणी केली होती. १० मार्चला मला चेकबुक पाठवले असल्याचे बँकेने सांगितले, परंतु तीन महिने झाले अद्याप चेकबुक मला मिळालेले नाही.- निंबाजी आहेर, सेवानिवृत्त शिक्षक, देवळा.

टॅग्स :businessव्यवसायBanking Sectorबँकिंग क्षेत्र