शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा शाप; डोक्याला ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:53 IST

मालेगाव शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : महिलांसह विद्यार्थी, वृद्धांचे हाल

मालेगाव : शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील डी. के. कॉर्नर ते चर्चगेट तसेच दाभाडी रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या रस्त्यावरून सोमवार बाजार, मालेगाव कॅम्प, नामपूर व कृषी कार्यालय आहे. त्यामुळे सतत वर्दळ असते. या रस्त्यामुळे दुचाकीचालक, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. वाहने खड्ड्यात आदळतात त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळून पाठदुखीचा त्रास वाहनचालकांना होत आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात या भागात किरकोळ अपघातही घडले आहेत. सोयगावसह अनेक भागात पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळेस खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित खड्ड्यांची डागडुजी व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टीगेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहरातील नागरिक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी केली जात आहे. तर काही खड्ड्यांमध्ये केवळ दगड व कमी थराचे डांबर मारुन खड्डे बुजविली जात आहेत. मनपाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.शहरातील बहुतांश भागातील रस्ते पावसाच्या पाण्यामुळे उखडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा लहान-मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खड्डे कायमस्वरूपी बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी.- स्वप्नील हिरे, नागरिक, सोयगाव

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा