शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिज्ञासा जोपासणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन होय :  दिलीप देवबागकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:19 IST

कोणतीही घटना आणि कृती याकडे जिज्ञासीवृत्तीने पाहणे आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणे होय, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केले. उन्नती शाळेतील बालविज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सोनजे होते.

नाशिक : कोणतीही घटना आणि कृती याकडे जिज्ञासीवृत्तीने पाहणे आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणे होय, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केले. उन्नती शाळेतील बालविज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सोनजे होते.  पंचवटीतील पेठरोड येथील उन्नती विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या बालविज्ञान केंद्र आणि बाल वाचनालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या इस्त्रो विभागाच्या प्रमुख दीप्ती देवबागकर, इंडिया चाप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरूडे, तपारिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन, संस्थेचे पदाधिकारी बापू बागड, सुभाष मुसळे, रमाकांत अलई, रवि अमृतकर, आबा पाटकर, सुभाष कुंभारे, विस्तार अधिकारी नेहा शिरूडे, वास्तुविशारद स्मिता वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे यांनी बालविज्ञान केंद्राचे उद्देश सांगताना सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी भावना असल्याचे सांगून या केंद्रामुळे अशा मुलांमध्ये स्फूर्ती निर्माण होईल, असे सांगितले. यावेळी शास्त्रज्ञ शिरूडे, दीप्ती देवबागकर, शिवरामकृष्णन, अ‍ॅड. मनिष अमृतकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष मुसळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन जितेंद्र सोनजे व प्रमोद कोठावदे यांनी केले. कार्यक्रमास सुधाकर बागड, चंदन मेखे, दिलीप पाटकर, विलास कोठावणे, सुभाष कुंभारे, रामदास अमृतकर, बापूराव शिनकर, रमाकांत अलई, सतीश सोनजे, संजय घरटे, आदी उपस्थित होते.शिकण्याची जिद्द महत्त्वाचीयावेळी देवबागकर म्हणाले, कोणतेही शिक्षण आणि माध्यम हे बुद्धिमत्तेच्या आड येत नाही. मराठी माध्यमातील विद्यार्थीदेखील हे मोठ्या पदापर्यंत पोहचू शकतात. परंतु त्यांच्यात शिकण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. कोणतीही गोष्ट असाध्य नाही, फक्त ते साध्य करण्याची जिद्द बाळगली तर काहीही शिकता येऊ शकते, असेही देवबागकर म्हणाले.

टॅग्स :scienceविज्ञान