शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सिडको सभापतीपदासाठी सेनेच्या उमेदवाराविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST

सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षीही सिडको प्रभागावर ...

सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षीही सिडको प्रभागावर शिवसेनेचाच सभापती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे; परंतु या पदासाठी शिवसेनेतदेखील मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याने सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सिडको प्रभाग सभापतीपदासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेतील विविध पदांचा लाभ घेणाऱ्या नगरसेवकांना संधी न देता ज्या नगरसेवकांना पदे मिळाली नाहीत अशांना सिडको प्रभाग सभापतीपद देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शिवसेनेकडून सुवर्णा मटाले, कल्पना चुंबळे, प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, संगीता जाधव, किरण गामणे यांनी तयारी दर्शविली आहे; परंतु नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीत नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी सिडको प्रभाग सभापतीपद मिळावे यासाठी स्थायी समिती सदस्यपद न घेता पक्षाच्या नेत्यांना सभापतीपद मिळावे असे कळविले आहे. त्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असली तरी सुवर्णा मटाले यांनाच सभापती होण्याचा मान मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून बोलले जात आहे.

चौकट===

सिडको प्रभागात २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १४ नगरसेवक होते; परंतु शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला नगरसेवक कल्पना पांडे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने शिवसेनेचे सध्या १३ नगरसेवक आहेत. यापाठोपाठ भाजपचे ९, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले हे एकमेव नगरसेवक आहेत.

कोट====

सिडको प्रभागावर शिवसेनेचाच सभापती होणार, हे निश्चित आहे; परंतु शिवसेनेतही सभापतीपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने याबाबत पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना नेते संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे जो उमेदवार देतील तोच शिवसेनेचा सभापती असेल.

सुधाकर बडगुजर

शिवसेना महानगरप्रमुख