शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नाशिक शहरात जमावबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:31 IST

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आयुक्तालय क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम-१४४ नुसार मनाई आदेश लागू करत असल्याची अधिसूचना बुधवारी (दि.१०) सकाळी जारी केली. या अधिसूचनेची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही अधिसूचना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव : दीपक पाण्डेय यांच्याकडून मनाई आदेश जारी

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आयुक्तालय क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम-१४४ नुसार मनाई आदेश लागू करत असल्याची अधिसूचना बुधवारी (दि.१०) सकाळी जारी केली. या अधिसूचनेची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही अधिसूचना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले आहे.शहरात मार्च महिना उजाडताच कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झपाट्याने होताना दिसत असल्याने, पाण्डेय यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयुक्तालय हद्दीत बुधवारी मध्यरात्री १ वाजेपासून ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत कलम १४४नुसार विविध प्रकारे मनाई आदेश राहणार आहे. या आदेशानुसार शहरात वावरताना नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने खबरदारी घेत वर्तणूक करणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क योग्यरीत्या लावणे बंधनकारक आहे, तसेच उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, धूम्रपान करण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे मेळावे, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, उरुस, मनोरंजन कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सर्व आठवडे बाजार भरविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत, अंत्यविधीसाठी २० लोकांना एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPolice Stationपोलीस ठाणे