शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आठ गावांत संचारबंदी

By admin | Updated: October 13, 2016 01:23 IST

तणाव टाळण्यासाठी पोलीस सज्ज : राजकीय नेत्यांचे दौरे

नाशिक : तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असली तरी ग्रामीण भागात होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आठ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातही पोलिसांनी संचलन करून नागरिकांना आश्वस्त केले.दरम्यान, नाशिक-मुंबई बससेवेबरोबरच शहर आणि काही तालुक्यांची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. बालकांवरील अत्याचारांच्या घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याबरोबरच खासदार संभाजी राजे, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण पाटील, कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनीदेखील पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मंगळवारी नाशिक शहराच्या सातपूर, गरवारे पॉइंट आणि अशा अनेक ठिंकाणी दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील एका नगरसेवकाला भावना भडकावण्याच्या प्रयत्नांवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर जेलरोड भागात तणाव झाला होता. मात्र तोही निवळला. सातपूर भागात दुपारपर्यंत संचारबंदीसदृश स्थिती होती. नंतर तेथेही जनजीवन सुरळीत झाले. मंगळवारी सिडकोत लेखानगर भागात एका नगरसेवकाच्या मोटारीवर दगडफेक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. भगूर येथे एका धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघड झाल्यानंतर भगूर बंद पाळण्यात आला. दुपारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी विविध समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि शांततेसाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले. तर दुपारी शहराच्या विविध भागातून पोलिसांनी संचलन केले. दरम्यान,शहरातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)