शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:29 IST

नांदगाव तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यात प्राथमिक गटातून नांदगावच्या कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती कलाकृतीला प्रथम, तर माध्यमिक गटातून आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळेची बहुद्देशीय सायकल या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

ठळक मुद्देनांदगाव : पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळा प्रथम; मनमाड येथील छत्रे हायस्कूल द्वितीय

नांदगाव : तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यात प्राथमिक गटातून नांदगावच्या कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती कलाकृतीला प्रथम, तर माध्यमिक गटातून आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळेची बहुद्देशीय सायकल या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.दोन दिवस चालणाऱ्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप उपसभापती भाऊसाहेब हिरे यांच्या उपस्थितीत झाला. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या २० व माध्यमिक विभागाच्या ३२ शाळांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या विज्ञानविषयक प्रदर्शन कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य व निपुणतेचे दर्शन उपस्थितांना घडविले.सौरऊर्जा, धान्य साठवण्याच्या पद्धती, रसायनांचा उपयोग न करता सफाई करण्यासाठी जैविक विघटन होणारा द्रव, अग्निबाण, प्लॅस्टिकचा वापर करून डांबरी रस्ता तयार करणे असे अनेक प्रकल्प यावेळी मांडण्यात आले होते. प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी गर्दी केली होती.प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे : माध्यमिक गट - आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्टबेसिक आश्रमशाळेतील विशाल गायकवाड याच्या बहुउद्देशीय सायकल या कृतीला प्रथम, मनमाड येथील छत्रे हायस्कूलच्या साहिरा खान हिने सादर केलेल्या सॅटेलाइट लाँच सायकलला द्वितीय, नांदगाव येथील व्ही. जे. हायस्कूलच्या स्नेहा निकम व आर्या शेवलकर यांच्या वॉटर रॉकेट या कृतीला तृतीय, तर मनमाडच्या व्ही. एन. नाईक हायस्कूलच्या ओंकार कापडे व दर्शन आंधळे यांच्या गवत कापणी यंत्राला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. शैक्षणिक साहित्य गटातील कलाकृतीत साकोरा येथील माध्यमिक विद्यालयाचे ए. आर. बोरसे यांचे इ -लर्निंग शैक्षणिक साहित्याला प्रथम, तर मनमाडचे छत्रे हायस्कूलचे गणेश गुजर यांच्या आॅल इन वन किटला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.शिक्षण अधिकारी नंदा ठोके, के. बी. सोनवणे पी. एस. चिंचोले, प्राचार्य एन. आर. ठोके, प्राचार्य पी. एस. अरु ण पवार,चैत्राम आहिर, सुनील कोठावदे, व्ही. पी. बोरसे, विष्णू कदम कार्यवाह पी.आर. खरोळे, नीलेश इप्पर, ए.एस. शेवाळे, पी.एस. फणसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. एस. बोरसे, श्रीमती ठाकूर यांनी केले. संजय बच्छाव यांनी आभार मानले.तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेचा निकालप्राथमिक गटात कमलाबाई कासलीवाल विद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी पाटील व दिव्या घोटेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीला या कलाकृतीला प्रथम, साकोरा येथील माध्यमिक विद्यालयातील शंतनू मवाळ व समीर शेवाळे यांच्या रिमोट कंट्रोल सिस्टीमला द्वितीय, मनमाड येथील एचएके विद्यालयातील शेख उसैद वाजीद व अल्तमश शेख यांच्या स्वच्छतेकडून आरोग्याकडे या कलाकृतीला तृतीय, तर मनमाड येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचा ऋषिकेश गवळी याच्या फरशी साफ करण्याचे यंत्र या कलाकृतीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

टॅग्स :Schoolशाळाscienceविज्ञान