शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदारस्नेही धोरणा’चे धक्कातंत्र

By admin | Updated: January 17, 2016 00:28 IST

दावेदारांना हुलकावणी : भाजपा शहराध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांची नियुक्ती

नाशिक : राज्यात बहुतांशी ठिकाणी आमदारांनाच शहर आणि जिल्हाध्यक्षपद नियुक्तीच्या भूमिकेमुळे नाशिकमध्येही आमदार बाळासाहेब सानप यांच्या गळ्यात माळ पडली आहे. या धक्कातंत्रामुळे अनेक प्रबळ दावेदार मागे पडले आणि तीन वर्षांसाठी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किशोर काळकर, निवडणूक अधिकारी संभाजीराव पगारे आणि उदय वाघ यांच्या उपस्थितीत या शहराध्यक्षपदाच्या उमेदवाराची शनिवारी घोषणा करण्यात आली. यापदासाठी माजी शहराध्यक्ष विजय साने, सुरेश पाटील आणि गोपाळ पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. पक्षाने इच्छुकांची नावे शिफारस करणाऱ्या समितीने माहितीचे संकलन सुरू केल्यानंतर सानप यांनीही इच्छा प्रदर्शित केल्याने तसा अहवाल श्रेष्ठींकडे पाठविण्यात आला होता. मात्र, सानप यांनी आजवर भूषविलेली पदे आणि सध्याही ते अनेक सत्तापदांवर असल्याने त्यांचा विचार होईल अशी कोणाला फारशी खात्री नव्हती. उलट त्यानंतरही माजी शहराध्यक्ष विजय साने आणि सुरेश पाटील यांच्याच नावावर कार्यकर्त्यांकडून खल होत होता. शनिवारी दुपारी वसंतस्मृतीत पक्षाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तसेच अन्य प्रदेश कार्यकर्त्यांनी इच्छुकांची बैठक बोलवली होती. त्यानुसार अंतर्गत बैठकीत सानप यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. नाराज झालेल्या गोपाळ पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांचा निर्णय स्वीकारला असला तरी यापूर्वी पक्षात आपले म्हणणे ऐकले जात नव्हते आता तरी ऐकले जाईल, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या बंद दरवाजाआडील चर्चेनंतर पक्षाचे नेते बैठकीतून बाहेर आले. निवडणूक निरीक्षक संभाजीराव पगारे यांनी शहराध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांच्या नावाची घोेषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.