नाशिक : मूल होऊ देण्यास असमर्थ असल्याने मित्राकडून संतती प्राप्त करवून घेऊ इच्छिणाऱ्या पतीचा प्रयत्न कसा फसतो आणि त्याची पत्नी त्याच्यापासून कशी दुरावते, याचे चित्रण ‘नो सेंटिमेंट्स प्लीज’ या नाटकातून करण्यात आले. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात येथील श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने ही वेगळी कथा सादर केली. प्राध्यापक पंडित व त्यांची पत्नी नंदा यांना बाळाची आस असते; मात्र मूल होऊ देण्यास पंडित असमर्थ असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे आपल्या जिवलग मित्राशी शारीरिक संबंध ठेवून मूल प्राप्त करण्याचा सल्ला पंडित त्यांच्या पत्नीला देतात; मात्र पत्नीची मित्राशी शारीरिक व भावनिक जवळीक निर्माण होते आणि त्यामुळे प्राध्यापक पंडित हेच आपल्या पत्नीपासून दुरावतात. मूल मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यांच्या कुटुंबालाच सुरुंग लागतो. नाटकाचे लेखन लक्ष्मण काटे यांचे होते. दिग्दर्शन व प्रमुख भूमिका प्रसन्न काटे यांनी साकारली. अभिजित कार्लेकर, हर्षल विसपुते, कावेरी सुरुसे यांच्याही भूमिका होत्या. नेपथ्य प्रतीक साळी यांचे, तर संगीत यश शिरसाठ यांचे होते. माणिक कानडे यांनी रंगभूषेची, तर रवि रहाणे यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली. -: आजचे नाटक :-लग्न नको, पण पप्पा आवर(अरविंद चॅरिटेबल ट्रस्ट, धुळे)वेळ : सायंकाळी ७ वाजता
अपत्यप्राप्तीचा फसलेला खेळ
By admin | Updated: November 20, 2015 23:56 IST