शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंडदानासाठी गोदाघाटावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:02 IST

भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती.

नाशिक : भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती. ज्या पितरांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहीत नसते, ज्यांचा आकस्मिक मृत्यू झालेला असतो अशा पितरांचा श्राद्धविधी आणि पिंडदान सर्वपित्री अमावास्येला करण्यात येत असल्याने शनिवारी पिंडदानासाठी रामकुंड परिसरात वेगवेगळ्या भागातील नागरिक पोहोचले होते.रामकुंडाच्या उत्तरेला असलेल्या मंदिराच्या वरच्या बाजूला पिंडदानासाठी असलेल्या जागेवर पिंड ठेवण्यासाठी जागा मिळणे मुश्किल झाले होते. त्यामुळे काकस्पर्श झालेल्या पिंडावर दुसरे पिंड ठेवण्यात येत होते. पिंड ठेवल्यानंतर काकस्पर्शासाठी संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय प्रतीक्षा करीत थांबून होते. ज्यांच्या पितरांच्या पिंडांना काकस्पर्श होत होता ते तेथून निघून जात होते. सर्वपित्रीच्या निमित्ताने नाशिकला येणाऱ्या या भाविकांकडून रामकुंडावर स्नानासाठी पहाटेपासूनच गर्दी करून हजारोंच्या संख्येने पिंडदान व श्राद्धविधीसाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.स्मृतीवन उद्यानाच्या भिंतीजवळही गर्दीकाकस्पर्श लवकर होत नसल्याने भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती. पंचवटी अमरधामजवळील स्मृतीवन उद्यानाच्या भिंतीवरही पिंडदान करण्यासाठी काही जणांची गर्दी झाली होती. या भागात वृक्षराजी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे कावळ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे येथे काकस्पर्श सहज होईल या भावनेने अनेक मृतांच्या कुटुंबीयांनी येथे पिंड ठेवले होते. दरम्यान, पूजाविधी आणि इतर खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने रामकुंड परिसरातील व्यावसायिकांनी पिंडदानासाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता करून ठेवली होती. सर्वपित्री अमावास्येला रामकुंड परिसरात दरवर्षी उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात येतात.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमgodavariगोदावरी