शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

लॉकडाऊनच्या धास्तीने पिंपळगावात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:38 IST

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला असून राज्यातल्या विविध जिल्ह्यात, शहरांत, गावात, गल्लीत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. १२ मे पासून २२ मे पर्यंत संचारबंदी राहणार असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी उसळली असून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याचे काम मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होताना दिसून आले.

ठळक मुद्देमाणसे अन‌् वाहनांच्या गर्दीने रस्ते, बाजारपेठा झाल्या जाम

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला असून राज्यातल्या विविध जिल्ह्यात, शहरांत, गावात, गल्लीत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. १२ मे पासून २२ मे पर्यंत संचारबंदी राहणार असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी उसळली असून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याचे काम मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होताना दिसून आले.जिल्ह्यात १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असल्याने कोणत्याही नागरिकांना घराच्या बाहेर पडणास सक्त मनाई असल्याने त्या धास्तीमुळे लोक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. परिणामी तालुक्यातील बाजारपेठेत मंगळवारी सकाळपासूनच गर्दी उसळली. प्रशासनातर्फे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंदचे आवाहन केले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गर्दीमुळे कोरोना नियमांचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे अधिक कडक नियम लादून बंद पुकारण्यात आल्याने बाजारपेठेत गर्दी उसळली. नागरिकांनी किराणा मालासह इतर खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत रांगा लावल्या. त्यातच भाजीसह अन्य विक्रेतेही रस्त्यावर ठाण मांडल्याने मंगळवारी (दि.११) पिंपळगाव शहरात आठवडा बाजाराचे स्वरुप आले होते.कुठेही सोशल डिस्टंन्सिंग नव्हते. अनेक जण मास्कविनाच बाजारात फिरत होते. शहरातील सर्वच दुकाने उघडल्याने मोठी गर्दी दिसून आली. पंधरा दिवसांचा लॉकडाऊन गृहित धरून नागरिकांची संसार साहित्याचा साठा करण्याची धडपड पहायला मिळाली. या अनुषंगाने पिंपळगाव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी वाहनांद्वारे शहरातून फेरफटका मारला. ध्वनीक्षेपकावरून आवाहन करीत असतानाच दुकाने बंद झाली नाहीत तर कारवाईचा इशाराही देण्यात येत होता. परंतु दुकाने सुरूच राहिली. विनामास्क फिरणाऱ्यांवर मात्र पोलीस पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली होती.इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह दुचाकी, चारचाकी वाहन, सोने बुकींगसाठी आजच काही नागरिकांनी संबंधित दुकानांचा दरवाजा ठोठावला. या गर्दीने बाजारपेठेत उत्साह दिसून आला होता. पेट्रोल पंपवारदेखील झुंबड उडाली होती.पेट्रोल भरून जाणार कुठे?दहा दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या वाहनधारकांनाच पेट्रोल बंधनकारक केले आहे. मग हा कडकडीत लॉकडाऊन असताना पेट्रोल भरून नागरिक नेमके जाणार तरी कुठे ? पेट्रोल पंपावर एवढी गर्दी करत आहेत आणि कोरोनाला आमंत्रण देत आहे असा सवाल या गर्दीला पाहता उपस्थित होत आहे, 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत