नाशिक : शहरातील विविध शासकीय, खासगी कार्यालये तथा औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यावर जमा झाले असून, येत्या दोन दिवसांत आणखी काही कामगारांचे वेतन खात्यांवर जमा होणार आहे. यातील अनेक कामगारांसह एटीएम व बँकेतून पैसे काढण्यासाठी विविध ग्राहकांनी गर्दी केली असताना बहुतेक सर्वांनाच पैसे मिळत असल्याने परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. दरम्यान, महिन्याच्या दहा तारखेपर्यंत विविध क्षेत्रांतील कामगारांचे वेतन होत असल्याने बँकेतील पैसे काढणाऱ्या ग्राहकांमध्येही नोकरदारवर्ग अधिक दिसून येत आहे. केंद्र सरकारने जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर ५८ दिवसांनंतर शहरातील बँका व एटीएममधून पैसे मिळण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे.
बँकांमध्ये पैसे काढणाऱ्यांची गर्दी
By admin | Updated: January 7, 2017 01:24 IST