शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

समाज जागृतीसाठी गावफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 17:00 IST

वडनेर भैरव ; येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजजागृतीसांक्ष गावफेरी काढली्यवडनेर भैरव मध्ये स्वामी विवेकानंद जयंती- युवा दिनाच्या निमित्ताने दि.१७ ते २४जानेवारी हा युवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या सप्ताहा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे वडनेर भैरव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग

त्याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक समस्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने वडनेर भैरव गावात गावफेरी काढण्यात आली होती. या गावफेरीत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे देखावे/ चित्ररथ साकारण्यात आले होते. यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखा, हैद्राबाद येथील प्रियांका रेड्डी प्रकरण, वारकरी सांप्रदायिक आदर्श दिंडी, गडकिल्ले वाचवा, विविधतेत एकता-देशाची शक्ती !, महाराष्ट्राची लोकपरंपरा, शिक्षणाने केला समाजाचा उद्धार आदी विविध विषयांवरील चित्ररथ, देखावे सहभागी झाले होते.गावातील ग्रामपंचायत समोर आणि शनिचौक येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादरीकरण केले. मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो ! या रासेयो च्या स्वयंसेवकांनी सादर केलेल्या पथनात्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन मर्यादित न राहता घेतलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी समाज जागृतीसाठी वापर केला पाहिजे. समाजात जाऊन विविध विषयांचे सादरीकरण करण्याची क्षमता व योग्यता निर्माण व्हावी यासाठी आमचा हा गावफेरी उपक्र म असतो , असे मत यावेळी प्राचार्य ए एल भगत यांनी व्यक्त केले.प्रा ज्ञानेश्वर भगुरे यांनी या गावफेरीचे संयोजन केले. महाविद्यालयाचे सर्वच प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी या गावफेरीत आवर्जून सहभागी झाले होते