नाशिक : गंगापूर व पंचवटी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, गंगापूर गावातील पाच लहान मुलांना, तर पंचवटीत एका इसमाला या कुत्र्याने चावा घेतला असून, या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ गंगापूर शिवारात शनिवारी पिसाळलेल्या कुत्र्याने शिवाजीनगर परिसरातील ध्रुवनगर पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या संकेत संदीप सुतार या पाच वर्षीय मुलाच्या मांडी व पोटास सकाळी दहा वाजेच्या सुमारास चावा घेतला़ यानंतर याच परिसरातील पवन चैतराम भुसारे या १२ वर्षीय मुलाच्या हातास, अरुणा आनंदा कुंभार या १३ वर्षीय मुलीच्या हातास चावा घेतला़ यानंतर या कुत्र्याने गंगापूर गावाकडे धाव घेऊन आदित्य वाघू पवार या पाच वर्षीय मुलास तसेच गौरव नामदेव जाधव या सात वर्षीय मुलास कुत्र्याने चावा घेतला, तर दुसरी घटना पंचवटीतील वाल्मीकनगरमध्ये घडली़ याठिकाणी राहणारे सुभाष वामन खरे (३८) यांचा हात व छातीस कुत्र्याने चावा घेतला़
शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: November 9, 2014 01:26 IST