शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात खरेदीसाठी गर्दी; नियमांची सर्रास पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:44 IST

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच येत्या बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, परंतु अक्षय्यतृतीया असल्याने करा-केळी, खरबूज व आंबे खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमांची पायमल्ली झालेली दिसून आली.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अक्षय्यतृतीयेसाठी आंंबे खरेदीला उधाण

येवला : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच येत्या बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, परंतु अक्षय्यतृतीया असल्याने करा-केळी, खरबूज व आंबे खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमांची पायमल्ली झालेली दिसून आली. तर प्रशासनानेही यावर कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आली.शहरातील शनिपटांगणावर सकाळी घासविक्र ी वरून व्यापारी व शेतकरी वाद होता होता राहिला. यावेळी परिसरातील लोक जमा झाले होते. पुढे केशवराव पटेल मार्केट आवारात हातगाडीवर आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत विक्र ेत्याकडील आंबे संपले. त्यानंतर मेनरोडवर खरबूज विक्रीच्या हातगाड्यांवरही नागरिकांकडून खरबूज खरेदी सुरू होती, तर काही करा-केळी विक्रेतेही या ठिकाणी बसलेले दिसून आले.याबरोबरच येवला-मनमाड महामार्गावर बनकर पेट्रोल पंपानजीकही आंबे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती. जवळच करा-केळी, खरबूज विक्र ीही सुरू होती. फत्तेबुरूज नाका येथेही करा-केळी, खरबूज, आंबे विक्र ी सुरू होती तर गंगादरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही आंबे विक्र ीच्या हातगाड्या लागलेल्या होत्या. वसाहत भागांमध्येही करा-केळी, खरबूज, आंबे यांची ठिकठिकाणी विक्र ी झाली.लॉकडाउन व संचारबंदीने आंबे व करा-केळीचे भाव यंदा दुप्पट-तिप्पट झाल्याचे दिसून आले. सर्वसाधारण ४० ते ५० रुपये किलोने विक्र ी होणारे आंबे यंदा शंभर ते सव्वाशे रुपये किलोने विकले गेले, तर साधारण ५० ते ६० रुपयांत मिळणारी करा-केळी यंदा सव्वाशे ते दीडशे रुपयांपुढे विकली गेली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार