शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नाशिकरोडला देखावे पाहण्यासाठी गर्दी

By admin | Updated: September 23, 2015 22:56 IST

नाशिकरोडला देखावे पाहण्यासाठी गर्दी

नाशिकरोड : परिसरातील लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे-आरासचे काम पूर्ण झाले असून देखावे बघण्यासाठी भाविकांची सहपरिवार गर्दी होऊ लागली आहे. सिंहस्थ व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बहुतांश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असल्याने उत्साहावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीला अडथळा ठरेल किंवा रस्त्यावर मंडप टाकण्यास बंदी केल्याने बहुतेक मंडळांनी थोडक्यात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. तर दुष्काळजन्य परिस्थितीमुळेदेखील अनेक मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. लहान-मोठ्या मंडळानी छोट्या-मोठ्या गणरायाची मूर्ती व मंडपात डेकोरेशन साकारून आपआपल्या परिसरात विद्युत रोषणाई केली आहे.नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा समुद्र मंथनाचा चलत देखावा, श्री बालाजी सोशल फाउंडेशनची म्युझिक लाईटिंग, ईगल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड सोशल क्लबची भव्य विलोभनीय गणेश मूर्ती, नवले चाळीतील अथर्व मित्रमंडळाचा श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत देखावा, वर्धमान मित्रमंडळाचा ‘मेक इन इंडिया’ चलत देखावा, सत्कार पॉर्इंट साईमुक्ती फ्रेंड सर्कलची भव्य गणेश मूर्ती, देवळालीगाव गाडेकर मळा मातोश्री मित्रमंडळाचा स्वच्छता अभियान देखावा, जयभवानी रोड येथील महाराजा साईराज मित्र मंडळाचा मच्छिंद्रनाथांच्या जन्मावर आधारीत देखावा, गोसावीवाडी येथील स्वराज्य सांस्कृतिक मंडळाचा कुंभमेळ्यावर आधारीत देखावा आदि मंडळाचे देखावे भाविकांचे आकर्षण ठरत आहे. या व्यतिरिक्त कुंभमेळा व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बहुतेक मंडळांनी छोटा मंडप उभारून गणरायाच्या छोट्या-मोठ्या मूर्तीची स्थापना करून देखावा, सजावट केली आहे. श्री गौरीचे विसर्जन झाल्यामुळे व मंगळवारी वरुणराजाने विश्रांती घेतल्याने सायंकाळनंतर देखावे बघण्यास भाविकांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)