शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी

By admin | Updated: June 15, 2014 18:27 IST

शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी

 

नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या संपून आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही शाळेचे वेध लागले असून, वह्या-पुस्तके, दप्तरे, रेनकोट, गणवेश अशा सगळ्याच वस्तूंच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात वह्यांच्या किमती वाढल्या असल्या, तरी बजेटनुसार त्या खरेदी करण्याकडे पालकवर्गाचा कल आहे.जून महिना सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. त्यामुळे मेनरोड, मुंदडा मार्केट, रविवार कारंजा, टिळकपथ, शालिमार यांसह उपनगरांतील दुकाने सध्या शालेय साहित्याने भरली आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारच्या, लहानग्यांना आकर्षित करणाऱ्या अशा वह्या उपलब्ध असून, अगदी दहा रुपयांपासून दीडशे- दोनशे रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडूंचे फोटो, अभिनेता व अभिनेत्री यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा पाठ्यपुस्तकांच्या किमतीत थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच रेनकोट, छत्र्या, सँडलच्या किमतीही वाढल्याचेच चित्र आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स इत्यादिंनी दुकाने सजली आहेत. महागाई वाढली असली, तरी प्रत्येक पालकाच्या बजेटनुसार शालेय साहित्य उपलब्ध असल्याचे दुकानदार आशिष मेहता यांनी सांगितले.ब्रँडेड कंपन्यांच्या वह्या, रजिस्टर बाजारात दाखल झाले आहेत. यासंदर्भात एका वही विक्रेत्याने सांगितले की, वह्या-पुस्तकांच्या विक्रीत अधिक उलाढाल होते. प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी एक डझन वह्या खरेदी कराव्याच लागतात. राज्य शासनाच्या वतीने अभ्यासक्रमांची पुस्तके मोफत दिली जातात; पण खासगी शाळा, खासगी प्रकाशकांची पुस्तके आणण्यास सांगत असल्याने खासगी प्रकाशकांनी तयार केलेली अभ्यासक्रमांची पुस्तकेही दाखल झाली आहेत. (प्रतिनिधी)