शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ढग्या डोंगरावर खंडोबा महाराज दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:00 IST

नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजांचे मंगळवारी लाखो भाविकांनी हजारो फूट उंचाची चढाई करत दर्शन घेतले.

ठळक मुद्दे शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजांचे मंगळवारी लाखो भाविकांनी हजारो फूट उंचाची चढाई करत दर्शन घेतले. जिल्हाभरातील हजारो भाविकांनी पहाटेपासून डोंगरावर गर्दी केली होती.ढग्या डोंगराच्या कड्याकपाºया येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट आदी घोषणांनी दणाणून गेला होता. अनेक भाविकांनी आपल्या घरातील देव्हाºयातील देवाचे टाक भेटीसाठी आणले होते. भाविकांनी नैवेद्य व तळी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. वाघ्या-मुरळीने खंजरी, झांजरी व तुणतुणे आदी वाद्यांच्या गजरात भाविकांच्या देवभेटीबरोबर अनेक गावातून खंडोबा महाराजांच्या भेटीसाठी आलेल्या काठ्यांचा कार्यक्रम पार पाडला. उंच असलेल्या ढग्या डोंगरावर चढणे कठीण आहे. अशातच उन्हाची तीव्रता झेलत भाविक हा डोंगर चढत दर्शन घेत असतात. अशावेळी येणाºया भाविकांना विविध अडचणीबरोबर पाण्याची अडचण येते. ही अडचण लक्षात घेऊन देशवंडी येथील सचिन कांगणे यांनी जे. एम. ग्रुपच्या सदस्यांसह यावर्षीही डोंगराच्या विविध टप्प्यांवर शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.