मुंजवाड : श्रीक्षेत्र दोधेश्वर येथील श्री महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांनी हजेरी लावून भोलेनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्री दोधेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. निसर्गरम्य परिसर आणि डोंगरावर सर्वत्र हिरवळ तसेच या ठिकाणी असलेल्या तलावात भाविकांनी अंघोळ करून महादेव मंदिरात पूजन केले. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येथील महंत राजेंद्रपुरी महाराज, यशवंत अहिरे यांच्या पुढाकाराने श्री महादेवाची विधिवत पूजा करण्यात आली. याकरिता संजय शर्मा, दिनेश भदाणे, अमृत सोनवणे आदिंचे सहकार्य लाभले. हा परिसर पर्यटन स्थळाप्रमाणे असल्याने अनेक भाविक व बहुसंख्य परिवारांनी या ठिकाणी गर्दी केली होती. (वार्ताहर)
दोधेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
By admin | Updated: August 23, 2016 00:13 IST