शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाव घसरल्याने शेतकºयांनी कोथिंबीर फेकलीएक रुपया जुडी : दोन दिवसापासून मेथीही घसरली; पालेभाज्यांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:22 IST

 पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतकºयांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत शेतमालाला ...

ठळक मुद्देभाव घसरल्याने शेतकºयांनी कोथिंबीर फेकलीएक रुपया जुडी : दोन दिवसापासून मेथीही घसरली; पालेभाज्यांची आवक वाढली

 

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतकºयांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत शेतमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला होता. मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मंगळवारी शेतमालाला कमी प्रमाणात उठाव असल्याने नाशिक बाजार समितीत बाजारभाव घसरलेले होते.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई शहर तसेच उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची निर्यात केली जात असते. मंगळवारी सायंकाळी मेथी भाजी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली होती, परंतु मुंबईला पाऊस असल्याने तसेच शेतमालाला उठाव नसल्याने मेथीला मातीमोल बाजारभाव होता. सध्या पालेभाज्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोथिंबीरची आवक वाढली आहे.काही दिवसांंपूर्वी सुमारे २७५ रुपये असा विक्र मी बाजारभाव गाठून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाºया कोथिंबीरचे बाजारभाव गुरुवारी पूर्णपणे घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. मात्र चांगला बाजारभाव न मिळाल्याने कोथिंबीर उत्पादन करणाºया शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत काढता पाय घेतला.नाशिकमधून मुंबईला कोथिंबीर माल रवाना करण्यात आला मात्र पुणे, खेड, मंचर या भागातील कोथिंबीर मुंबई बाजारात विक्र ीसाठी दाखल होत असल्याने तसेच गुजरात राज्यातही स्थानिक कोथिंबीर माल दाखल होत असल्याने गुजरातची निर्यात थांबली आहे. परिणामी उठाव कमी झाल्याने बाजारभाव ढासळले आहेत.