शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी कोट्यवधी रुपये : सातपूरमधीलच ठेकेदाराकडून खरेदी जप्त भंगारातून साडेचार लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:48 IST

नाशिक : महापालिकेने दि. १२ ते १४ आॅक्टोबरदरम्यान सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्यासाठी केलेल्या कारवाईला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च आला.

ठळक मुद्देभंगार बाजार हटविण्याची कारवाईमाल जप्त करण्याची भूमिका

नाशिक : महापालिकेने दि. १२ ते १४ आॅक्टोबरदरम्यान सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्यासाठी केलेल्या कारवाईला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च आला; परंतु कारवाईदरम्यान जप्त केलेल्या भंगार मालातून महापालिकेच्या हाती अवघे साडेचार लाख रुपये पडले आहेत. दोनवेळा लिलाव प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ई-निविदाद्वारे जप्त भंगार मालाची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सातपूर क्लब हाउसवर पडून असलेला भंगार माल हटला आहे.महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची कारवाई पार पाडली होती. त्यावेळी महापालिकेला कारवाईवर ८५ लाख रुपये खर्च आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भंगार बाजाराने हातपाय पसरले आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु न्यायालयाने व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावत त्यांना दंडही ठोठावल्याने महापालिकेचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्तरीत्या दि. १२ ते १४ आॅक्टोबर या कालावधीत पुन्हा एकदा भंगार बाजार हटविण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत महापालिकेने मात्र जागेवर असलेला माल जप्त करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मालाची वाहतूक करताना महापालिकेची मोठ्या प्रमाणावर दमछाक झाली. तीन दिवसांत महापालिकेने बाजारात मूल्य असलेला सुमारे ३७४ गाड्या भरून भंगार माल जप्त केला आणि तो महापालिका मालकीच्या सातपूर क्लब हाउस येथे नेऊन टाकला होता. सदर जप्त मालाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने दोन वेळा लिलाव प्रक्रिया राबविली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तिसºयावेळी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबविली असता, सातपूर येथीलच साई प्लॅस्टिक प्रॉडक्ट्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. त्यानुसार जप्त करण्यात आलेले १२,३४० किलो लोखंड २२ रुपये प्रतिकिलो, २१ हजार ७८० किलो कोळसा प्रतिकिलो ४ रुपये, तर २६,७८० किलो लाकूड ३.२० रुपये दराने विक्री करण्यात आले. त्यातून महापालिकेला ४ लाख ५५ हजार रुपयांची कमाई झाली.पैसे वसूल करण्याचे आव्हानमहापालिकेने पहिल्या वेळी जानेवारी २०१७ मध्ये कारवाई केली त्यावेळी ८५ लाख रुपये कारवाईवर खर्च आला, तर आॅक्टोबरमध्ये केलेल्या कारवाईत जप्त मालाची वाहतूक करण्यातच लाखो रुपये खर्च झाले. सदर कारवाईचा खर्च हा संबंधित भंगार मालाच्या व्यावसायिकांकडूनच वसूल करण्यात येणार आहे. त्यानुसार जे व्यावसायिक आपल्या जागेवर बांधकाम परवानग्यांसाठी नगररचना विभागाकडे अर्ज दाखल करतील त्यावेळी त्यांना अतिरिक्त शुल्क लावून कारवाईचा खर्च वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, अद्याप व्यावसायिकांकडून परवानग्यांसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याने महापालिकेपुढे पैसे वसूल करण्याचे आव्हान आहे.