शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुके, पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:16 IST

जळगाव नेऊर : खरीप पिकांच्या संकटातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच येवला तालुक्यात सध्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून, शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : करपा, डाऊनी, बुरशी रोगाच्या विळख्याने उत्पादन घटणार?

जळगाव नेऊर : खरीप पिकांच्या संकटातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच येवला तालुक्यात सध्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून, शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.या वातावरणामुळे पिके जगविण्यासाठी औषध फवारणी करून शेतकऱ्यांचा खर्च भरमसाट वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोपे नसल्याने भाजीपाला केला होता; पण त्यातूनही खर्चदेखील वसूल न झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरवला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके हे शेतातच सोडून दिलेले आहे.आता मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दव आणि धुके पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी करूनही भाव मिळत नसल्याने वैतागून भाजीपाला पिके सोडून दिलेले आहे. तसेच पुढील दिवसांमध्ये थोड्या फार प्रमाणात असलेल्या पोळ कांदा काढणीस सुरुवात होणार आहे; परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाण्याची झाली आहे. सतत बदलणारे हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी जास्त प्रमाणात वाढली आहे.गेली चार-पाच दिवसांपासून सतत पडणारे धुके, दव व पाऊस यामुळे कांदा पीक करपा रोगाच्या विळख्यात सापडले असून, औषधे फवारणी करूनही रोगट वातावरण साथ सोडायला तयार नसल्याने मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे कांदा पिकावर करपा येऊन कांदा पात करपत आहे.- नीलेश शिंदे, जळगाव नेऊर.(फोटो १४ जळगाव नेऊर)जळगाव नेऊर परिसरात सतत पडणाऱ्या धुके, ढगाळ वातावरणामुळे औषधे फवारणी करताना शेतकरी.