शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संपातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:51 IST

वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात सहभागी असणाºया कर्मचाºयांची माहिती राज्य परिवहन महामंडळाने मागविली आहे.

नाशिक : वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात सहभागी असणाºया कर्मचाºयांची माहिती राज्य परिवहन महामंडळाने मागविली आहे.  गेल्या दोन वर्षांपासून परिवहन महामंडळातील वेतनाचा मुद्दा गाजत असून, वेतनाच्या प्रश्नावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतन करार जाहीर केल्यानंतर ८ आणि ९ रोजी राज्यात एस.टी. कर्मचाºयांनी अघोषित संप पुकारला होता. मात्र या संपाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. संप नेमका कोणत्या संघटनेने पुकारला याविषयी कुणी पुढेही आले नाही. या संपामुळे दोन दिवसात राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, तर प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारण्यात आलेल्या संपामुळे प्रशासन आणि प्रवाशांचीही चांगलीच धावपळ झाली.  वेतन करारामुळे कर्मचाºयांना अपेक्षित आर्थिक लाभ होणार नसल्याचा आरोप करीत यामुळे कर्मचाºयांच्या पदरी निराशा पडल्याचे पडसाद उमटून संपाचा प्रकार घडला होता. मात्र कराराला विरोध करणाºयांपैकी कोणत्याही संघटनेने संपाची जबाबदारी स्वीकारली नसल्याने संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. राज्यभरात अनेक कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. आता परिवहन महामंडळाने आपला मोर्चा बदली मागणाºया कर्मचा-यांकडे वळविला असून, जे संपात सहभागी होते अशा कर्मचा-यांच्या बदलीला यामुळे खो बसणार असल्याचे एकूणच चित्र निर्माण झाले आहे.  राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापकांनी याप्रकरणी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून विनंती बदली मागणाºया कर्मचाºयांची माहिती मागविली आहे. अघोषित संपाच्या कालावधीत संपात सहभागी असलेल्या कर्मचाºयांपैैकी पदनिहाय कोणकोणत्या कर्मचाºयांनी बदली मागितली आहे याची माहिती राज्यभरातून गोळा केली जातआहे. संपासारखा विषय अतिशय गंभीर असून, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभाग नियंत्रकांनी सोमवारपर्यंत कर्मचाºयांची नावे कळवावित, असे पत्र विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ