शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अधिकाऱ्यांपुढील संकट कायम

By admin | Updated: November 7, 2014 00:23 IST

ग्रामपंचायत निवडणूक : आॅनलाईन अर्जात चूकांची मालिका

नाशिक : नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज आॅनलाईन भरण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आग्रहामुळे अडचणीत आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांचे संकट अद्याप कायम असून, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उभ्या ठाकलेल्या तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय अडचणी दूर करून, आॅनलाईन ऐवजी छापील स्वरूपाचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अनुमती देण्यात यावी अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगाकडे केली आहे. आयोगाच्या आॅनलाईचा फतवा पाहता, गुरूवारी सुटीच्या दिवशीही अनेक तहसिलदारांनी कार्यालयात धाव घेवून राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आॅनलाईन दिलेल्या लिंकवर जावून काही माहिती भरण्याचा प्रयत्न केला असता,त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका व त्रुटी असल्याचे आढळून आल्या. विशेष म्हणजे उमेदवाराचे नाव व आडनाव टाईप केल्यास त्याच्या वडीलांचे नाव न टाकल्यावरही चुकीचे नाव आॅनलाईनवर दिसू लागले आहे, त्याच बरोबर राखीव प्रवर्गाबाबतही काही प्रवर्गाचा त्यात समावेशच नसल्याने निवडणूक अधिकारी संकटात सापडले आहेत. एकीकडे आयोगाचा आग्रह तर दुसरीकडे नामांकनात दोष आढळल्यास कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन सोमवारपासून सुरू झालेले असले तरी, साधारणत: शेवटच्या दिवसातच उमेदवारांची गर्दी होते त्यामुळे शुक्रवार व शानिवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी उडणारी झुंबड व आॅनलाईन मध्ये येणाऱ्या अडचणींमुळे वाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्'ातील ज्या ज्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत, त्या त्या तहसिलदारांनी आपल्यापुढे येणाऱ्या अडचणी लिखीत स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना कळवून मार्गादर्शन मागविले असून, त्याच्याशी सहमत होत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनीही राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून अवगत केले आहे. त्यात उपरोक्त अडचणींचा पाढा वाचतानाच, त्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याने आॅनलाईनमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यास त्यानंतरच्या वेळेत अर्ज स्वीकारता येईल काय अशी विचारणा करतानाच, तांत्रिक कारणास्तव उमेदवारांचे छापील नामांकन स्वीकारण्यासाठी अनुमती देण्यात यावी व ग्रामपंचायत निवडणुकीत ही प्रणाली वापरण्यापूर्वी अधिकाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे अशी शिफारसही केली. परंतु शासकीय सुटी असल्याने आयोगाकडून कोणतेही मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने या संदर्भातील संकट कायम आहे.