शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:26 IST

पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक गहाळ केल्याप्रकरणी सुरगाणा येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक : पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक गहाळ केल्याप्रकरणी सुरगाणा येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले.सुरगाणा पंचायत समितीमध्ये कार्यरत असेलेले वरिष्ठ सहायक सुनील महाजन हे निफाड पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात कार्यरत असताना त्यांच्याकडे आस्थापनेचा कार्यभार होता. त्यांची सुरगाणा येथे बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडील कार्यभार देताना सर्व बाबींचे हस्तांतर करणे आवश्यक होते; मात्र निफाड तालुक्यात कार्यरत असलेल्या एका पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक त्यांनी हस्तांतर केले नाही, याबाबत त्यांना पाच वेळा कारणे दाखवा नोटीस देऊनही त्यांनी सदरचे पुस्तक जमा केले नाही व समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाºयास फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती; मात्र समाधानकारक खुलासा सादर न केल्याने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात  तक्र ार दाखल करण्यासाठी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.दुय्यम मूळ सेवापुस्तक करण्याची परवानगीसंबंधित पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे दुय्यम मूळ सेवा पुस्तक तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सेवापुस्तक हा जतनीय दस्तऐवज असून, मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम ५२ खालील परिशिष्ट १७ नुसार सेवा पुस्तक हे प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करण्याची जबाबदारी सदर काम करणाºया कर्मचाºयांची आहे; मात्र अशाप्रकारे कुणी याबाबत हलगर्जीपणा करणार असेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्याचा इशाराही डॉ गिते यांनी दिला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद