शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

जमावाच्या मारहाणीमुळे गुन्हेगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:48 IST

नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़११) मध्यरात्री घडली़ गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मृत्यूच्या ...

नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़११) मध्यरात्री घडली़ गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मृत्यूच्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे़मॅँगो काळ्या याने शुक्रवारी सायंकाळी अतिमद्यसेवन केले होते़ अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाट परिसरात त्याने एका महिलेची छेड केल्याने तेथील नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला़ यामध्ये मुक्का मार लागल्याने एका जागेवर पडलेल्या मँगो काळ्याबाबत काही नागरिकांनी १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून माहिती दिली़ त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र अतिमद्यसेवन केल्याने होत असलेल्या उलट्यांमुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयात शनिवारी मँगो काळ्याचे शवविच्छेदन करण्यात आले़