शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क नागरिकांवर फाैजदारी गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:13 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून मुक्तता होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तहसील कार्यालयात तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक ...

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून मुक्तता होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तहसील कार्यालयात तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीस एक हजार रुपये दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातदेखील जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांना गर्दी करू नये, तसेच दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवावीत, असे आवाहन करतानाच कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याचे आदेश कासुळे यांनी दिले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी नागरिकांना सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडणे व वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ धुवावेत, तसेच सर्दी, खोकला, ताप असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावे, आदी सूचना दिल्या. याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, सरपंच भगवान वाकचौरे, ग्रामसेवक पोपट बोडके, आशा सेविका विजया जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती परशिरे, पोलीस कर्मचारी सोनवणे, वाजे, परदेशी, धरांकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबकराव डुकरे, हिरामण चिकने, परशराम वाकचौरे, भाऊसाहेब कडभाने आदी उपस्थित होते.

इन्फो

पिंपळगाव डुकरात कारवाई

गुरुवारी (दि.१८) इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर साकुरफाटा येथील दुकानदार व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी सरपंच भगवान वाकचौरे, सरपंच देवीदास देवगिरे, ग्राम अधिकारी नितेश हेंबाडे यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

फोटो- १८ पिंपळगाव डुकरा

पिंपळगाव डुकरा येथे साकुरफाट्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची माेहीम राबविताना गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड समवेत सरपंच भगवान वाकचौरे, ग्रामसेवक नितेश हेंबाडे, भरत वेंदे आदी.

===Photopath===

180321\18nsk_14_18032021_13.jpg

===Caption===

 फोटो- १८ पिंपळगाव डुकरा पिंपळगाव डुकरा येथे साकुरफाट्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची माेहीम राबवितांना गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड समवेत सरपंच भगवान वाकचौरे, ग्रामसेवक नितेश हेंबाडे, भरत वेंदे आदी.