शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

त्र्यंबकला गर्भगृहात प्रवेश नाकारल्याप्रकरणी गुन्हा

By admin | Updated: April 16, 2016 00:34 IST

त्र्यंबकला गर्भगृहात प्रवेश नाकारल्याप्रकरणी गुन्हा

त्र्यंबकेश्वर : सतत दोन दिवसांपासून प्रयत्न करूनही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारून अपमानजनक वागणूक दिली व महिलांना धक्काबुक्की, मारहाण केल्याची फि र्याद स्वराज्य महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनिता गुट्टे व त्यांच्या तीन सहकारी महिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकणी त्र्यंबक पोलिसांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्या प्रकरणी सुमारे २०० ते २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत वनिता गुट्टे यांनी, दि. १३ व १४ एप्रिल या दोन दिवसांपासून मी व माझ्यासमवेत असलेल्या सुरेखा राजू थोरात, शारदा शिवकुमार भटपती, मनीषा राजाराम कुंजीर, निर्मला शंकर अडसूळ व अनिता दिगंबर मोटकर आणि इतर २० ते २५ महिला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करीत असताना आम्हाला मंदिरातील पुजारी, पुरोहित, नगरसेवक, ग्रामस्थ, मंदिराचे विश्वस्त, महिला-पुरुष आदिंनी आरडाओरड करून गर्भगृहात जाऊ दिले नाही. महिला गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही असे म्हणत या सर्व मंडळींनी आम्हाला धक्काबुक्की करून मारहाण केली. शिवीगाळ करून बळजबरीने आम्हाला मंदिराबाहेर घालविण्यात आले.आम्ही मंदिर प्रांगणात बसलो असताना प्रशासकीय अधिकारी तेथे आले व कार्यालयात चला, तेथे आम्ही ३-४ महिला गेल्यावर उद्या सकाळी (दि. १४) ६ ते ७ या वेळेत महिला-पुरुष भाविकांना मंदिरात (गर्भगृहात) प्रवेशाची वेळ असते. तुम्ही ड्रेस कोड फॉलो करून या तुम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळेल, असे आम्हाला तोंडी सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही सुती साड्या परिधान करून गेलो. यावेळेस तुमच्या अंगावर ओले कपडे नाही वगैरे कारणे दाखवून प्रवेश दिला नाही. प्रत्येक पायरीवर पुरोहित होते. आम्हाला प्रवेश द्यायचा नव्हता या हेतूने केवळ वेळकाढू धोरण अवलंबून सकाळी ७ वाजेनंतर गर्भगृह प्रवेश नाही असे कारण सांगत मंदिरातील २०० ते २५० जणांनी आम्हाला मारहाण,धक्काबुक्की, शिवीगाळ करत अपमानित करून, बळजबरीने मंदिराबाहेर काढले. तिसऱ्यांदा पोलिसांना बरोबर घेऊन केवळ दोन ते तीन महिला जाऊनही तीच पुनरावृत्ती झाली. पण गर्भगृहात प्रवेश मिळू दिला नाही. तथापि विरोध करणाऱ्यांचे नाव, गाव माहीत नसल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी महाराष्ट्र हिंदू सार्वजनिक प्रार्थनास्थळे प्रवेश मान्यता अधिनियम १९५६चे कलम ४(अ) १(अ) ५ प्रमाणे २०० ते २५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे देवस्थानच्या नियमांचा भंग केला. आरडाओरड केली व मंदिरात शिवीगाळ केल्याचा तक्रार अर्ज त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याचे समजते. हॉटेलमालकाने चहा दिला नाही मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील हॉटेलात चहा पिण्यासाठी गेलो असताना हॉटेलमालक व त्यांच्या नोकरांनी आम्हाला चहा देण्यासही नकार दिला, असे या महिलांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. (वार्ताहर)