शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिडको भागात गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:35 IST

काही दिवसांपूर्वीच सिडको व सातपूर भागाला जोडणाºया आयटीआय पुलाजवळ एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको व सातपूर भागातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, पोलिसांच्या खाकीचा वचक राहिला नसल्याने खुनाचे सत्रच सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी नुकतेच पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले.

सिडको : काही दिवसांपूर्वीच सिडको व सातपूर भागाला जोडणाºया आयटीआय पुलाजवळ एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको व सातपूर भागातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, पोलिसांच्या खाकीचा वचक राहिला नसल्याने खुनाचे सत्रच सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी नुकतेच पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीजीपीनगर, केवळपार्क, खान बंगला परिसर, शिवशक्ती चौक, खुटवडनगर यांसह परिसरात गुन्हेगारी वाढली असून, ठिकठिकाणी टवाळखोरांचा वावर वाढला आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करून लूटमार करणे, मोबाइल तसेच गाड्यांची चोरी करणे, नागरिकांना मारहाण-दमदाटी करणे असे अनेक प्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबरोबरच अंबड औद्योगिक वसाहतीत काम करणाºया कामगारांना मारहाण करून लूटमार करण्याचे प्रकारही नित्याचेच झाले असतानाही याकडे मात्र पोलिसांकडून गांभीयाने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. संजीवनगर, पाटील पार्क परिसरात दोन वेळेस टपोरी मुलांनी महामंडळाच्या एसटी बसच्या काचा फोडल्या असतानाही पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. चौकाचौकात अनेक टवाळखोर बसत असून महिला व मुलींची छेड काढत असून, पोलिसांचा वचक नसल्याने गुन्हेगारही कोणालाही जुमानत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच सातपूर परिसरामध्येही गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गाड्या जाळणे, वाटसरूंना मारहाण करणे आदी प्रकार घडत असल्याने पोलिसांनी लक्ष द्यावे याबाबत शिवसेनेच्या वतीने नुकतेच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, संकेत आहेर, माधव केदारे, पंकज दातीर, शेषकुमार सिंह, स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.