सिन्नर : तालुक्यातल्या नायगाव येथील युवकाच्या आत्महत्त्येप्रकरणी मयत युवकाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नायगाव येथील गणेश फकीरा राजभोज (२७) या युवकाने सोमवारी घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी मयत गणेश याची आई अरुणा राजभोज यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नायगाव येथील रशीद आत्तार, आवेज रशीद आत्तार व समीर रशीद आत्तार या तिघांनी गणेश यास ‘तू पत्नीला घरातून काढून का दिले, तिला परत घेऊन ये’ असे म्हणून मानसिक त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी रशीद आत्तार, आवेज रशीद आत्तार व समीर रशीद आत्तार यांच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मोतीलाल वसावे, हवालदार राम भवर, लक्ष्मण बदादे, नितीन सांगळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
युवकाच्या आत्महत्त्येप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
By admin | Updated: November 17, 2015 22:46 IST