शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:05 IST

सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिंपरवाडी : दोन मुलींसह विहिरीत संपवले होते जीवन

सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरवाडी येथील मनीषा अनिल गायकवाड (३०) या विवाहितेने चार वर्षाची मोठी मुलगी व चार महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ राजेंद्र खुजरे (रा. नगरसूल ता. येवला) यांनी सासरी बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे म्हटले आहे. बहीण मनीषा हिस दोन मुली झाल्या तसेच माहेरुन पैसे आणावेत आणि पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने तिचा सासरी छळ केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सासरच्या जाचाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी पोलिसांनी पती अनिल त्र्यंबक गायकवाड, सासू मालन त्र्यंबक गायकवाड, भाया संजय त्र्यंबक गायकवाड व जाऊ वनिता संजय गायकवाड या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. याप्रकरणी चौघांही संशयितांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याPolice Stationपोलीस ठाणे