शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत खेळणीतल्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:51 IST

मालेगाव : तालुक्यातील सायने शिवाराती गट क्रमांक ४४८ मधील जमीन विक्री प्रकरणी दावा येथील लोक न्यायालयात दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत १५ लाख रुपये देण्याची तडजोड करून दावा निकाली काढण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. न्यायालयात ठरलेली १५ लाखांची रक्कम संजय बद्रिनाथ परदेशी व राजेंद्र बद्रिनाथ परदेशी या दोघांनी खेळण्यातल्या खोट्या नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देही बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर झालेला समझोता रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे सांगितले

जमीन व्यवहाराच्या तडजोडीसाठी परदेशी बंधूंनी दिलेल्या खेळणीतल्या नोटा.

मालेगाव : तालुक्यातील सायने शिवाराती गट क्रमांक ४४८ मधील जमीन विक्री प्रकरणी दावा येथील लोक न्यायालयात दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत १५ लाख रुपये देण्याची तडजोड करून दावा निकाली काढण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. न्यायालयात ठरलेली १५ लाखांची रक्कम संजय बद्रिनाथ परदेशी व राजेंद्र बद्रिनाथ परदेशी या दोघांनी खेळण्यातल्या खोट्या नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बळीराम हरी पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या शेतजमिनीचा एक कोटी ५ लाख रुपयांना व्यवहार झाला होता. या व्यवहारातील १५ लाख रुपये संजय परदेशी व त्यांचे बंधू राजेंद्र परदेशी यांनी देण्यास टाळाटाळ केली होती. सदरचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत दावा तडजोडीसाठी ठेवण्यात आला होता. दोघा पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर १५ लाख रुपये देण्याचे न्यायालयासमोर ठरले होते. यानंतर संजय व राजेंद्र परदेशी या दोघांनी त्यांनी आणलेल्या पिशवीतून पैसे पाटील यांना दिले. वकिलांच्या चेंबरमध्ये पिशवीतील पैसे मोजण्यासाठी घेतले असता परदेशी बंधूंनी लघुशंकेच्या नावाखाली पळ काढला. पैसे मोजत असताना परदेशींनी दिलेल्या ५०० च्या नोटा असलेले ३० बंडल लहान मुलांना खेळण्यातल्या दिल्याचे उघडकीस आले. ही बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर झालेला समझोता रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. बळीराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत.