शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवेबाबत ‘क्रिसील’ देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:20 IST

सल्लागार नियुक्त : मनपाकडून तीन महिन्यांची मुदत

ठळक मुद्देमहापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाहीएसटी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत बऱ्याच मार्गावरील फेऱ्या  कमी केल्या आहेत

नाशिक - महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतची व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी सल्लागार म्हणून के्रडीट रेटींग अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सर्व्हीसेस आॅल इंडिया लिमिटेड अर्थात क्रिसील या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर संस्थेला जानेवारी २०१८ पर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली असून त्यानंतर शहर बससेवेचा फैसला होण्याची शक्यता आहे.शहर बससेवा तोट्यात चालल्याने एसटी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत बऱ्याच मार्गावरील फेऱ्या  कमी केल्या आहेत. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबतही महामंडळाने वारंवार आग्रह चालविला असून त्याबाबतची स्मरणपत्रेही दिली पालिकेला पाठविली जात आहेत. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेऊ नये, याबाबतचे ठराव महासभेने यापूर्वीच केलेले आहेत. मात्र, महापालिकेत भाजपा सत्तारुढ झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्याविषयी अनुकूल मते व्यक्त केली जात आहेत. दोन महिन्यांपूर्वीच आयुक्तांनी शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत ठेवला होता. सदर प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा मागविण्यात आल्या होत्या. यावेळी दहा संस्थांनी प्रतिसाद दिला. त्यात क्रिसील या वित्तीय संस्थेचे सर्वात कमी दर आल्याने सदर अहवाल तयार करण्याचे काम क्रिसीलला देण्यात आल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. सदर संस्थेला अहवाल तयार करण्यासाठी १५ लाख रुपये अदा केले जाणार आहेत. संस्थेने जानेवारी २०१८ अखेरपर्यंत आपला अहवाल महापालिकेला सादर करायचा आहे. त्यामुळे फेबु्वारी २०१८ मध्ये शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा फैसला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महामंडळाचा अल्टीमेटमशहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत एसटी महामंडळाने महापालिकेच्या मागे लकडा लावला आहे. आताही विभागीय आगार व्यवस्थापकांनी मार्च २०१८ पर्यंत महापालिकेला डेडलाइन दिली असून त्यानंतर शहर बससेवा महामंडळामार्फत बंद करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे, महापालिकेला त्यापूर्वी आपला निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.