पंचवटी : कौटुंबिक वादामध्ये चुलत पुतण्याची समजूत काढल्याचा राग मनात धरून कुरापत काढून चुलत भावाच्या पायावर कुºहाडीने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.३) रात्री ११ वाजेच्या सुमारास मखमलाबादमधील कोळीवाडा परिसरात घडली आहे. पंडित रामभाऊ झोले (५०) असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, याप्रकरणी संशयित चुलत भावावर म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबाद (कोळीवाडा) येथील रहिवासी पंडित रामभाऊ झोले हे शुक्रवारी रात्री ११ वाजता घराजवळ उभा असलेला चुलत पुतण्या अतुल रमेश झोले यास समजावून सांगत होते. या गोष्टीचा राग अतुलचे वडील संशयित रमेश कारभारी झोले यांना आला व त्यांनी हातात कु ºहाड आणून चुलत भाऊ पंडित यांच्या उजव्या पायावर वार केले. यामध्ये पंडित झोले गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक आंनद वाघ, व्ही. डी. शार्दुल, एस. व्ही. बेडिवाल, घटनास्थळी दाखल झाले होते़
कौटुंबिक वादातून चुलत भावावर कुºहाडीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:10 IST