शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवानाच्या पार्थिवावर वीरगाव येथे अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 14, 2014 01:54 IST

वीरगाव : जम्मू येथील सांबा सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या वीरगाव येथील संजय नेरकर या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पार्थिव शरीर वीरगाव येथे आणण्यात आले.

वीरगाव : जम्मू येथील सांबा सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या वीरगाव येथील संजय नेरकर या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पार्थिव शरीर वीरगाव येथे आणण्यात आले. यावेळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. तर सीमा सुरक्षा व पोलीस दलाच्या सलामी पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडुन संजय नेरकर यांना अखेरची मानवंदना दिली. आठ वर्षीय रोशनने आपल्या पित्यास मुखाग्नी दिला.विरगाव येथील विठ्ठल नेरकर यांचे सुपुत्र संजय हे वर्षापुर्वी सीमा सुरक्षा दलाच्या ९ बटालियन मध्ये भरती झाले होते. सद्यस्थितीत जम्मु येथील सांबा सेक्टरमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. तेथेच त्यांचा अपघाती मृत्यु झाला. यानंतर सुमारे ३६ तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार्थिव विरगाव येथे आणण्यात आले.संजयचे पार्थिव विरगाव येथे आणताच नेरकर परिवारातील सदस्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला. तर वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षीच संजय सर्वाना सोडुन गेल्याने नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांना ही यावेळी गहिवरुन आले होते. काल सकाळी ८ वाजेच्या सुमारास पार्थिव विरगाव येथे सिमा सुरक्षा दलाच्या खास वाहनाने आणण्यात आल्यानंतर मुखदर्शनानंतर ते सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातुन या वीर जवानाची मिरवणुक काढण्यात आली. संजय नेरकर जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. अंत्ययात्रेसाठी जनसमुदाय उपस्थित होता.ग्रामीण पोलीस दलाच्या सलामी पथकाने हवेत ३ फैरी तर सिमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ५ फैरी झाडुन संजयला मानवंदना दिली. यावेळी आमदार उमाजी बोरसे, संजय चव्हाण यांसह राजकीय, सामाजिक, महसुल व शासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.