शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

निसर्गातूनच देव संकल्पनेची निर्मिती

By admin | Updated: March 27, 2017 01:00 IST

नाशिक : आदिमानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे,

नाशिक : आदिमानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे, असे मत नास्तिक विचारवादी व्याख्याते इरफान इंजिनिअर यांनी व्यक्त केले.  निसर्गातील आपत्कालीन समयी भीतीने तत्कालीन परिस्थितीत मानवाने कर्मकांडाला प्राधान्य दिले. असे कर्मकांड घडवून आणणारे पुढे धार्मिक स्थळांच्या माध्यमातून ईश्वर आणि ईश्वरवादी धर्माच्या आधारे इतरांना निसर्गातील या वस्तुस्थितीपासून दूर ठेवत अज्ञानात ढकलू लागले. यातील ज्यांनी बंड करून या ब्रह्मांडातील सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची गाथा पाण्यात बुडविणारे याच विचारधारेचे पाईक होते, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नाशिक येथे विवेकधारा ग्रुपतर्र्फे शहीद भगतसिंग स्मृतिदिन आणि नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नास्तिकांच्या ब्राइट संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्त्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे उपस्थित होते. इरफान इंजिनिअर म्हणाले, ज्यांनी निसर्गाच्या शक्ती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा म्हणून हीन वागणूक देण्यात आली. या स्थितीतून सत्य परिस्थितीचा विचार जगासमोर मांडणारे नास्तिक म्हणवले गेले. परंतु, विज्ञानाची प्रगती अशाच नास्तिकांमुळे झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या नाकारणे म्हणजे नास्तिक. नास्तिकतेचा हाच विचार जगाला ज्ञानसंपन्न करू पाहत आहे. देवाच्या अस्तित्वाचा पुरावा आतापर्यंत कोणीही देऊ शकलेला नाही. धर्म सत्ताकेंद्र होत असताना भ्रष्ट व्यवहाराबरोबरच दुर्बल घटकांवर अन्याय होतो, याची प्रचिती आली आहे. परंतु, मानवाची जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तसे ते प्रयत्नही कमी कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)