नाशिक : मार्च एण्डमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तीन दिवस ‘दांडी’ मारल्यामुळे मनमाडजवळचा पानेवाडी डेपो बंद राहिला. त्यामुळे शहरातील पेट्रोलपंप चालकांना पेट्रोलचा पुरवठा होऊ शकला नाही. परिणामी बहुतांश पेट्रोलपंपावर खडखडाट झाला असून ‘पेट्रोल शिल्लक नाही’चे फलक लागले आहेत. दरम्यान, काही पेट्रोलपंपांवरील कर्मचाऱ्यांकडून ‘बेमुदत संप’ सुरू झाल्याची अफवा देखील पसरविली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पानेवाडी डेपोवर सध्या इंडियन आॅइल, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलचे उत्पादन घेतले जाते व या कंपन्यांच्या टॅँकरमधून धुळे, जळगाव, नाशिकमध्ये पेट्रोलचा पुरवठा केला जातो. शहरातील नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, बोधलेनगर, द्वारका, मुंबईनाका, त्र्यंबकनाका या भागातील पेट्रोलपंपावर पेट्रोल जवळपास संपले असून पंचवटी भागातील मोजक्याच पंपांवर पेट्रोल उपलब्ध असल्याने नागरिकांची त्या भागात गर्दी वाढू लागली आहे.
मार्च एण्डमुळे पेट्रोलियम कंपन्यांची ‘दांडी’ शहरात तुटवडा
By admin | Updated: April 3, 2017 13:17 IST