शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाकपा मनपा, जिल्हा परिषद लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:18 IST

या बैठकीत पक्ष संघटना व जनसंघटनेबाबत आढावा घेण्यात येऊन पक्षाची ताकद आजमाविण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांनाही सत्तेत वाटा मिळवून देण्यासाठी आगामी ...

या बैठकीत पक्ष संघटना व जनसंघटनेबाबत आढावा घेण्यात येऊन पक्षाची ताकद आजमाविण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांनाही सत्तेत वाटा मिळवून देण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅली यशस्वी करण्यासाठी किसान सभा, भाकपाच्या वतीने जिल्हाभर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकरी-कामगारविरोधी केंद्र सरकारचे धोरण कायदे प्रस्तावित वीजबिल विधेयक शेतकरीविरोधी आहे. एलआयसीचे खाजगीकरण, बँक विलीनीकरण धोरण, पीकविमाबाबत शेतकरी फसवणूक, कसत असलेल्या वनजमिनी त्वरित नावावर करा, सर्व कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, वाढती महागाईविरोधात, पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधात १५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या दरम्यान, एक लाख सह्या जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सचिव कॉम्रेड भास्कर शिंदे यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी गणपत देशमुख, कॉम्रेड सुभान भाई देशमुख, कॉम्रेड शिवनाथ जाधव, कवी सतीश काळसेकर, कॉम्रेड विजय गणाचार्य, कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांना तसेच दिल्ली शेतकरी आंदोलनातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. बैठकीस राज्य सहसचिव कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ कॉम्रेड राजू देसले, विराज देवांग, ॲड दत्तात्रेय गांगुर्डे, नामदेव बोराडे, पद्माकर इंगळे, वित्तल घुले, किरण डावखर, एस खतीब, शिवाजी पगारे, जगन माळी, ज्ञानेश्वर माळी, ॲड. समीर शिंदे, सुनीता कुलकर्णी, मीना आढाव, अविनाश दोंदे, निवृत्ती कसबे, नितीन शिरलकर, प्रा. आर. भोंग आदी उपस्थित होते.

चौकट===

ट्रॅक्टर रॅलीचे भुजबळांना निवेदन

शेतकरीविरोधी कायद्याविरोधात काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीची माहिती व निमंत्रण देण्यासाठी रविवारी (दि.२२) शेतकरी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन माहिती दिली. यावेळी भुजबळ यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात शरद आहेर, तानाजी जायभावे, निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, मनोहर कोरडे, रमेश औटे, अशोक खालकर, राजू देसले, विष्णुपंत म्हैसधुणे, सुदाम बोराडे, केशवराव बाेराडे, शिवाजी म्हस्के आदींचा समावेश होता.

(फोटो २२ भुजबळ)