शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वासंती माळी यांना न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: January 17, 2017 01:50 IST

वासंती माळी यांना न्यायालयाचा दिलासा

नाशिक : अधिकार नसताना नवीन शर्र्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांना परवानगी देण्याच्या कारणास्तव नांदगाव तालुक्यातील तत्कालीन तहसीलदारासह २३ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्णात सोमवारी (दि़१६) मुंबई उच्च न्यायालयाने येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांना ३० जानेवारीपर्यंत दिलासा दिला आहे़दिनांक ५ जानेवारी रोजी नांदगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक हेमंत भामरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती़ नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी अधिकार नसताना नवीन शर्थीच्या जमिनींचे व्यवहार करण्यास अनुमती दिली व त्यातून शासनाचा सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा या फिर्यादीत करण्यात आला होता़  लाचलुचपत खात्याच्या या कारवाईविरोधात माळी यांनी मालेगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता़ मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली़ त्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनावर गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर सुनावणी झाली़ त्यावेळी सरकार पक्षाची पुरेशी तयारी नसल्याने सोमवारपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़ सोमवारी यावर पुन्हा न्यायमूर्ती भाटकर यांच्यासमोर अ‍ॅड़ अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला असता सरकार पक्षातर्फे पुन्हा कागदपत्र व पुरेशी तयारी नसल्याचे कारण देत पुन्हा दोन आठवड्यांची मुदत मागून घेण्यात आली़ त्यामुळे माळी यांना दिलासा मिळाला असून, न्यायालयाने दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत़