शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

न्यायालयाच्या निर्णयाने प्रशासन निर्धास्त

By admin | Updated: September 15, 2015 23:16 IST

न्यायालयाच्या निर्णयाने प्रशासन निर्धास्त

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव करणारी याचिकेची पुढील सुनावणी आठवडाभर लांबणीवर पडल्याने व तत्पूर्वीच कुंभमेळ्याचे अंतिम व तिसरे शाहीस्नान आटोपले जाणार असल्याने प्रशासन निर्धास्त झाले असून, याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याची बाब निदर्शनास आणून देण्याची तयारी चालविली आहे. मुंबई उच्च न्यायालयात नाशिकच्या गंगापूर धरणातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी पाणी सोडण्यास हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आली. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असून, धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा असल्याने अशा परिस्थितीत साधू-महंतांच्या स्नानासाठी पाणी सोडण्यास मज्जाव करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने त्यावर सोमवार (दि. १४) रोजी सुनावणी ठेवली असता, धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला, मात्र त्यावर शासनाचे म्हणणे ऐकून घेण्याचे व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सूचना करून पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी ठेवली. दरम्यान, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या दोन पर्वण्या पार पडल्या असून, या काळात गंगापूर धरणात यापूर्वीच राखून ठेवण्यात आलेले पाणी स्नानासाठी सोडण्यात आले आहे. कुंभमेळ्याची तिसरी व अंतिम पर्वणी १८ सप्टेंबर रोजी असून, त्यासाठीदेखील पाणी राखून ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपली जाणार आहे त्यामुळे प्रशासन निर्धास्त झाले आहे. न्यायालयाची दिशाभूल''सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने वाढीव पाण्याची मागणी केल्याने त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या पाण्यातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी पर्वणीसाठी राखून ठेवण्यात आलेले असले तरी, गेल्या दोन पर्वण्यांसाठी फक्त १९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले व तिसऱ्या पर्वणीलाही पाणी सोडण्यात येणार आहे. पर्वणीसाठी राखून ठेवलेल्या ६०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी फक्त ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर सिंहस्थासाठी करण्यात येणार असून, उर्वरित पाणी धरणातच राहणार आहे. शिवाय स्नानासाठी सोडण्यात आलेले पाणी गोदापात्रातच असून, ते वाया गेलेले नाही. मात्र न्यायालयात याचिकाकर्त्यांनी ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचा उल्लेख करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी