शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट फी स्टॅम्प अखेर उपलब्ध

By admin | Updated: July 3, 2014 00:08 IST

कोर्ट फी स्टॅम्प अखेर उपलब्ध

 

नाशिक : न्यायालयीन व सरकारी कामासाठी लागणाऱ्या कोर्ट फी स्टॅम्पची पाच आणि दहा रुपयांची तिकिटे मंगळवारपासून नागरिकांना न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट सोसायटीमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती सोसायटीचे व्यवस्थापक शशिकांत मुठाळ यांनी दिली आहे़ ‘न्यायालयीन कामासाठीच्या तिकिटांचा तुटवडा’ असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन कोषागार कार्यालयाने सोसायटीला ही तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत़न्यायालयात व सरकारी कार्यालयात अर्ज देताना पाच व दहा रुपयांची तिकिटे लावावी लागतात. ही तिकिटे स्टॅम्पवेंडर आणि वकिलांच्या सोसायटीत वकील, तसेच सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असतात़ गेल्या चार महिन्यांपासून पाच व दहा रुपयांची तिकिटे मिळत नसल्याने वकिलांबरोबरच सामान्य नागरिकांना मनस्तापाबरोबरच आर्थिक झळही मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत होती़ मंगळवारी कोषागार कार्यालयाने न्यायालयातील नाशिक डिस्ट्रीक्ट अ‍ॅडव्होकेट सोसायटीला पाच रुपयांची ४५००, तर दहा रुपयांची ३६०० तिकिटे उपलब्ध करून दिली. सोसायटीत ही तिकिटे उपलब्ध झाल्याने नागरिकांबरोबरच वकिलांनीही समाधान व्यक्त केले़ कोषागार कार्यालयाने पाच व दहा रुपयांच्या तिकिटांचा पुरवठा कायम ठेवावा, अशी इच्छाही नागरिकांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)