शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 14:42 IST

गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे.

ठळक मुद्देउत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत ‘जोश’सोबत ‘होश’ सांभाळून मोहीम फत्ते करावयाची आहे,नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या १८ जवानांचा चमू रवाना

नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये कुठल्याही सेनेच्या चमूने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत असलेल्या गंगोत्री-१, २ व ३ हे पर्वत सर करण्याचे लक्ष्य घेऊन नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या १८ जवानांचा चमू शनिवारी (दि.७) सकाळी रवाना झाला. मेजर जनरल संजय थापा यांनी ध्वज देऊन चमूला ‘मिशन गंगोत्री’साठी शुभेच्छा दिल्या. चमूने ही मोहीम यशस्वीपणे ‘फत्ते’ केल्यास तोफखान्यासह भारतीय सेनेच्या इतिहासात एका वेगळ्या साहसी विक्रमाची नोंद होईल.तोफखाना केंद्राच्या जवानांनी गंगोत्री पर्वतारोहणाची साहसी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर केंद्रातील १८ जवान सहभागी झाले असून, मेजर करण दया, मेजर जे. एस. सोढी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून (दि.९) जवानांचा चमू पर्वतावर चढाई करण्यास सुरुवात करणार आहे. गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे. या संपूर्ण मोहिमेचा कालावधी १० आॅक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.या चमूला गंगोत्री मोहिमेसाठी ध्वजप्रदान करताना मेजर जनरल थापा म्हणाले, निसर्गापुढे कोणाचेही चाललेले नाही हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. निसर्गाशी जो खेळण्याचा प्रयत्न करतो त्याला निसर्ग कधीही माफ करत नाही. त्यामुळे वातावरणातील आव्हाने, धोके ओळखून गंगोत्रीची चढाई यशस्वी करावी. ‘जोश’सोबत ‘होश’ सांभाळून मोहीम फत्ते करावयाची आहे, याचा विसर पडू देऊ नये, असा सल्ला त्यांनी यावेळी चमूला दिला.

मागील दहा वर्षांचा इतिहास बघता गंगोत्रीचे तीनही पर्वत अद्याप कुठल्याही सेनेच्या चमूने सर केलेले नाही. बर्फाळ प्रदेशात उणे तपमानात राहून तोफखान्याचे साहसी जवान या मोहिमेवर निघाले असून, २० दिवसांमध्ये गंगोत्री-३पर्वताच्या पायथ्याला पोहचण्याचे ध्येय या चमूने डोळ्यांपुढे ठेवले आहे. या साहसी मोहिमेदरम्यान तांत्रिक कौशल्य, अनुभव, प्रेरणा, शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. यासाठी जवानांना विविध नैसर्गिक वातावरणाच्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवानTrekkingट्रेकिंग