शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

देशाची वाटचाल अराजकतेकडे

By admin | Updated: January 6, 2017 00:44 IST

शरद पवार : राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

 नाशिक : नोटबंदीच्या निर्णयाने शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, उद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकालाच फटका बसला आहे. हा निर्णय कोणी एकट्याने घेतला की सामूहिक होता हे समजू शकलेले नसले तरी, हा सत्तेचा अधिकार केंद्रित करण्याचा एक भाग आहे. ज्या ठिकाणी मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित होते तेव्हा ती भ्रष्ट होत जाते व अशी सत्ता घेत असलेले निर्णयही देशाला अराजकतेकडे नेतात, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. पवार पुढे म्हणाले, देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेले आॅपरेशन योग्य असले तरी, आॅपरेशननंतर ज्या पद्धतीने रुग्णाची काळजी घ्यायला हवी तसे न झाल्यामुळे रुग्ण दगावण्याचीच भीती आहे असे सांगून, पंतप्रधान मोदी जेव्हा दूरदर्शनवरून महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर झाले तेव्हा असे वाटले की पठाणकोट, उरी व लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते पाकिस्तानबद्दल ठोस निर्णय घेतील, परंतु त्यावर भाष्य न करता त्यांनी देशातील ८६ टक्के चलन रद्दी झाले म्हणून जाहीर केले. हे सांगत असताना पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडण्यापूर्वी आकाशवाणीवरून देशाला संबोधित केले होते याची आठवण करून दिली. देशातील काळा पैसा नष्ट करण्याच्या विषयावर एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा झाली होती. सध्याचे राष्ट्रपती व तत्कालीन वित्तमंत्र्यांनी त्यावेळी ७७ हजार कोटी रुपये काळा पैसा असल्याचे सांगितले होते. आत्ताच्या राजवटीत एक लाख ८६ हजार कोटी रुपये काळा पैसा चलनात फिरतो, असे सरकारचे म्हणणे आहे व म्हणून ते चलनातून रद्द केले, असे समर्थन केले जात असेल तर त्यातील ९८ टक्के रक्कम आता बॅँकेत जमा झाल्याचे प्रसिद्ध होत असल्यामुळे देशात नेमका किती काळा पैसा आहे, असा सवालही पवार यांनी केला.